आपला बातमीदार | गजानन तायडे
जामनेर (प्रतिनिधी) –
जामनेर तालुक्याचे भाग्यविधाते तथा महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर शहरात कमल फाउंडेशनतर्फे एकलव्य प्राथमिक शाळेत भव्य मोफत रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन, भाजप नेते जितेंद्र भाऊ पाटील, जे. के. दादा चव्हाण, संजू दादा गरुड, शरद पाटील सर, नवल दादा पाटील, तुकाराम निकम, मंडलाध्यक्ष रवी झाल्टे, दीपक भाऊ तायडे, गटनेत्या सौ. संध्याताई पाटील, सभापती आतिश भाऊ झाल्टे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिबिरात एकूण ३०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कॅन्सर, यूरोलॉजी, न्यूरोलॉजी, हृदयरोग, बालरोग, स्त्रीरोग, अस्थिरोग, कृत्रिम सांधेरोपण, जनरल सर्जरी तसेच नेत्रतपासणी अशा विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
विशेष म्हणजे,
२४ रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत
४ रुग्णांना अँजिओप्लास्टीसाठी मोफत पाठविण्यात येणार
३७ रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया मोफत होणार
१४५ रुग्णांना तत्काळ चष्मे वाटप करण्यात आले
या शिबिरासाठी वनिता हॉस्पिटल, चांडक कॅन्सर हॉस्पिटल तसेच कमल हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले. डॉ. रवी महाजन, डॉ. निलेश चांडक, डॉ. निखिल पाटील, डॉ. सौरभ पाटील, डॉ. आनंद जैन, डॉ. प्रितेश कोठारी, डॉ. मनोज पाटील, डॉ. भूषण सोमानी, डॉ. नेहा काब्रा, डॉ. कृतिका चौधरी यांसह अनेक तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. नेत्ररोग विभागाची जबाबदारी श्री. पांडुरंग आल्हाट यांनी सांभाळली.
कार्यक्रमादरम्यान जिल्हा मेडिकल असोसिएशनतर्फे जामनेर तालुक्यासाठी ४ शीत शवपेट्यांचे लोकार्पण नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच, शिबिराला आलेल्या रुग्णांसाठी उन्हापासून बचाव म्हणून मुस्लिम बांधव नगरसेवक युनुस भाई, हारुण भाई व भाजप कार्यकर्त्यांनी दूध व शीतपेयांचे वाटप करून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.
या उपक्रमासाठी कमल फाउंडेशनचे सदस्य तसेच भाजप कार्यकर्त्यांनी परिश्रम घेत शिबिर यशस्वी केले.
