महिलेसह पतीला मारहाण; कचरा टाकण्याच्या कारणावरून वाद चिघळला
जामनेर | गजानन तायडे
गारखेडा (ता. जामनेर)
येथे घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गारखेडा गावात ही घटना घडली. फिर्यादी सूरज शांताराम चौधरी (वय ३२, व्यवसाय मजुरी, रा. गारखेडा, ता. जामनेर) यांच्या घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला.
या प्रकरणी निलेश हरिदास चौधरी, साई निलेश चौधरी, नैतिक निलेश चौधरी, विद्या निलेश चौधरी व कल्पनाबाई हरिदास चौधरी (सर्व रा. गारखेडा, ता. जामनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादीस चाकू व फायटरने मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादीच्या पत्नीला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२) व १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गजानन काळे करीत आहेत.
