जामनेर (प्रतिनिधी)
शहरातील बोदवड रस्त्यावरील नर्सरी परिसरात घडलेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातानंतर काही काळ मृताची ओळख पटली नव्हती; मात्र आता त्याची ओळख निश्चित झाली आहे.
मृत तरुणाचे नाव विजय शिवाजी इंगळे असे असून तो नाद्रा हवेली येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. अपघातावेळी तो MH 19 BB 5188 क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होता.
अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. या दुर्दैवी घटनेमुळे जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
