आपला बातमीदार | गजानन तायडे
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ तासांत हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या कालावधीत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मंत्रालय, मुंबई येथून देण्यात आली आहे.
अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेषतः उघड्यावर काम करणारे, शेतकरी तसेच प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, वीज पडण्याच्या शक्यतेमुळे झाडाखाली उभे राहणे टाळावे, मोबाईलचा वापर कमी करावा आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
👉 प्रशासनाचा सल्ला :
▶️सुरक्षित ठिकाणी थांबा
▶️विजेच्या खांबांपासून दूर राहा
▶️अनावश्यक प्रवास टाळा
▶️शेतात काम करताना काळजी घ्या
▶️हवामान खात्याच्या या इशाऱ्यामुळे नागरिकांनी पुढील काही तास विशेष दक्षता बाळगणे गरजेचे आहे.
