आपला बातमीदार | जामनेर
दिनकर महाराज बहुउद्देशीय संस्था संचलित ओशन इंटरनॅशनल स्कूल (ICSE Pattern) जामनेर येथे शुक्रवार दि. 13 मार्च 2026 रोजी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात शाळेच्या चेअरमन सौ. लक्ष्मी वायकर तसेच उपमुख्याध्यापिका सौ. सूचिता सोनवणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मेडल, प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
नुकत्याच पार पडलेल्या स्पोर्ट्स डे तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये चित्रकला स्पर्धा, सोलो डान्स (एकल नृत्य), कविता स्पर्धा, गोष्टी सांगण्याची स्पर्धा आदी उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पारितोषिके मिळवली.
तसेच SOF ऑलिम्पियाड स्पर्धेमध्येही शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनरल नॉलेज, इंग्रजी, सायन्स व गणित या विषयांत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
