आपला बातमीदार | जामनेर
शहरातील शास्त्रीनगर भागातील सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी परिसरातील अंतर्गत रस्ते व गटार बांधकाम कामांचे भूमिपूजन आज सकाळी उत्साहात पार पडले. जामनेर नगरपरिषद यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्षा साधनाताई गिरीश महाजन यांच्या हस्ते विधिवत पूजा करून विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, मुख्याधिकारी नितीन बागुल, गटनेता संध्या जितेंद्र पाटील, बांधकाम सभापती अतिश छगन झाल्टे, सभापती तेजस पाटील, सुहास पाटील, श्रीराम महाजन, स्वप्ना रविंद्र झाल्टे, दत्तू नामदेव जोहरे, उज्वला दीपक तायडे, पूजा सुभाष पवार, उज्वला मुकुंदा सुरवाडे, प्रतिभा जितेश पाटील, शितल गोकुळ माळी, माधुरी गजानन कचरे, सुरेखा सुनील पाटील, निलिमा राहुल पाटील, किलुबाई गिमल्या शेवाळे, वेणुबाई रमेश माळी, दिपक प्रवीण डांगी आदी नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार रस्ते व सुसज्ज गटार व्यवस्था उपलब्ध होणार आहे. पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या दूर होऊन स्वच्छता व वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद कटिबद्ध असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
