आपला बातमीदार | जामनेर
दिनकर महाराज बहुउद्देशीय संस्था संचलित ओशन इंटरनॅशनल स्कूल (ICSE पॅटर्न), जामनेर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदजी यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास शाळेच्या चेअरमन सौ. लक्ष्मी वायकर मॅडम तसेच मुख्याध्यापिका सौ. सीमा श्रोत्रिया मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्याध्यापिका सौ. सुचिता सोनवणे यांनी स्वामी विवेकानंदजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शिक्षिका कु. संजना सोनी यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी कु. संजना सोनी यांनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जीवनकार्याबद्दल विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती देत त्यांचे संस्कार, त्याग व शिवराय घडविण्यातील योगदान स्पष्ट केले. तसेच कु. श्रुती जोशी यांनी स्वामी विवेकानंदजी यांच्या विचारांचा युवकांसाठी असलेला प्रेरणादायी संदेश विशद केला.
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, संस्कार व प्रेरणादायी विचार रुजविण्याचा उद्देश साध्य करण्यात आला. जयंती कार्यक्रमामुळे शाळेतील वातावरण प्रेरणादायी व उत्साहपूर्ण झाले होते.
