आपला बातमीदार न्युज | जामनेर
दिनकर महाराज बहुउद्देशीय संस्था संचलित ओशन इंटरनॅशनल स्कूल (ICSE Pattern), जामनेर येथे आज दिनांक 07 नोव्हेंबर 2025, शुक्रवार रोजी सोलो डान्स (एकल नृत्य) व आई आणि मुलांची नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
या कार्यक्रमास शाळेच्या चेअरमन सौ. लक्ष्मी वायकर मॅडम तसेच मुख्याध्यापिका सौ. सीमा श्रोत्रिया मॅडम प्रमुख उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रुती जोशी यांनी केले, तर स्पर्धेचा निकाल सौ. सुचिता सोनवणे व सौ. कोमल शिंदे यांनी जाहीर केला.
सोलो डान्स स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान करून विविध गीतांवर आकर्षक नृत्य सादर केले. या स्पर्धेत
🏆 प्रथम क्रमांक – अधिरा भिसे
🥈 द्वितीय क्रमांक – गुंजन राजपूत
🥉 तृतीय क्रमांक – हार्दिक राजपूत
यांनी मिळवला.
तर आई आणि मुलांची नृत्य स्पर्धा देखील विशेष आकर्षण ठरली. यात
🏅 प्रथम क्रमांक – रियांश पाटील व त्यांची आई भूमेश्वरी पाटील
🥈 द्वितीय क्रमांक – त्रिशा महाजन व तिची आई पौर्णिमा महाजन
यांनी पटकावला.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी विद्यार्थ्यांचा उत्साह आणि कलागुणांचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रम आनंद, उत्साह आणि स्नेहाने साजरा झाला.
