आपला बातमीदार | गजानन तायडे
ड्राय डे घोषित असतानाही जामनेर शहरात देशी - विदेशी दारूची उघडपणे विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाने धार्मिक आणि राष्ट्रीय सणांच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीवर बंदी घातली असतानाही काही बेधडक विक्रेते कायद्याला चक्क धाब्यावर बसवत अवैधरीत्या दारू विकताना दिसले.
🔸शहरातील प्रमुख अवैध मद्य विक्रीचे ठिकाणे
जामनेर शहरातील आठवडे बाजारात असलेल्या सर्व देशी दारू दुकानासमोर खुलेआम देशी दारू विक्री.
बोदवड रोड वरील नायरा पेट्रोल पंपासमोर एका ढाब्या च्या पुढे सर्रासपने नियम धाब्यावर बसवून विदेशी मद्य विक्री जोरात.
पाचोरारोड वरील इंडियन ऑयल पेट्रोल पम्प परिसरातील सर्रास पणे देशी - विदेशी मद्य विक्री
भुसावळ रोडवर बाय पास नजीक असलेल्या प्रख्यात असलेल्या ढाब्यावर अतिशय चालाखीने मद्य विक्री
🔸 नागरिकांचा संताप
नागरिकांनी सांगितले की, “प्रशासनाचे अधिकारी हातावर हात ठेवून बसले आहेत. ड्राय डे असूनही खुलेआम दारू विकली जातेय, हे अत्यंत लाजिरवाणं आहे. "
🔸 सामाजिक संस्थांची मागणी
स्थानिक सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. "अवैध दारूविक्रीमुळे तरुण पिढी बिघडते, आणि ड्राय डेच्या दिवशी विक्री म्हणजे शासनाच्या आदेशाची थेट पायमल्ली," असे मत स्थानिक समाजसेवकांनी व्यक्त केले.
