आपला बातमीदार | जामनेर
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. प्रमोद कठोरे (पी.आय, पहुर पोलीस स्टेशन) व
श्री. प्रदीपभाऊ लोढा (चेअरमन, महावीर पब्लिक स्कूल) ,श्री. पवन रुणवाल (सह सचिव, भारतीय जैन संघटना, जळगाव जिल्हा),श्री. स्वप्निल छाजेड़ (शहराध्यक्ष, भारतीय जैन संघटना), श्री. अरविंद चौरडिया, श्री. सुनील लोढा, श्री. रूपेश लोढा,श्री. दीपक लोढा
यांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदरणीय शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आमच्या संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्निल भैया छाजेड़, श्री. सुनील लोढा, श्री. रूपेश लोढा, सौ. भाग्यश्री बेदमुथा, सौ. आरती कोटेचा यांनी आपली उपस्थिती दर्शवून सोहळ्याची शोभा वाढवली.
या कार्यक्रमात
ईश्वर मूळचंद चौरडिया, सुनयना मनोज रुणवाल, शंकर रंगनाथ भामरे
या प्रमुख शिक्षकांन सह इतर एकूण 20 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉ क्षीरसागर,उपाध्यक्ष जोशी,सचिव भामेरे सर, शरद बेलपत्रे यांच्यासह इतर पत्रकार व भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी भारतीय जैन संघटनेच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांना मनःपूर्वक धन्यवाद व आभार मानण्यात आले.
