आपला बातमीदार | गजानन तायडे
जामनेर येथे उबाठा गटात मोठी खिंडार पडली असून राहुल चव्हाण जे उबाठा गटात राज्य संघटक होते यांनी उबाठा गटाला राजीनामा ठोकून आज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजपात पक्ष प्रवेश केला.
यावेळी जामनेर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व राहुल चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने हजर होते तर या विषयी राहुल चव्हाण यांना पक्ष प्रवेशा बद्दल विचारणा केली असता त्यांनी उबाठा चे राज्य संघटक पद माझ्याकडे असले तरी जळगाव जिल्ह्यात व आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जर आपल्याला बाजूला सारले जात असेल आणि अनेक चढाओढ बघायला मिळत असेल तर आपण पूर्वी ज्या संघटनेत काम करीत होते.
त्या संघटनेत का काम करू नये असा विचार करून एक सामाजिक विचारधारेसाठी त्याकरिता आज मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात आज मी भाजपा विचारधारेला स्वीकारून जामनेर येथे पक्ष प्रवेश केला. व येणाऱ्या काळात आपल्या कामानुसार आपल्याला नेतृत्व मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यांच्या या पक्ष प्रवेशा मुळे जामनेर नगरपरिषद निवडणुकित एक नवीन चित्र व अनेक समीकरणे बदलण्याची नागरिकांमध्ये चर्चा दिसून येत आहे. मुख्यत: जामनेर प्रभाग १ मध्ये नवीन चर्चा सध्या बघायला मिळत असून भाजपा कडून आता चित्रित असणाऱ्या राजकीय पटावर आता राजकीय निवडणुकीची समीकरणे बदलणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
