आपला बातमीदार न्युज | गजानन तायडे
भाजपा जळगाव जिल्ह्याची नुकत्याच जाहीर झालेल्या कार्यकारणीत वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे तरुण तडफदार युवा नेतृत्व डॉ. सागरदादा गरुड यांची वैद्यकीय आघाडी च्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
डॉ. सागरदादा गरुड हे समाजकारण, आरोग्यसेवा व संघटन कौशल्य यासाठी ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर कार्यकारिणी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) मधील विविध मोर्चा व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस , भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली.
भाजपा नेते जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.ना. गिरीशभाऊ महाजन, केंद्रीय राज्यमंत्री मा.ना. रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री मा.ना. संजयजी सावकारे यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश महामंत्री मा. विजयराव चौधरी, विभाग संघटनमंत्री मा. रविजी अनासपुरे, खासदार मा. स्मिताताई वाघ, आमदार मा. सुरेश भोळे (राजुमामा), आमदार मा. मंगेशदादा चव्हाण व आमदार मा. अमोलदादा जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हाध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
या नियुक्त्या भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रामधन बाविस्कर (जिल्हाध्यक्ष, भाजपा जळगाव जिल्हा – पूर्व) यांनी जाहीर केल्या.
1 अनुसूचित जमाती मोर्चा श्री. हरिलाल रमेश कोळी मु.पो. कांडवेल, ता. रावेर
2 ओबीसी मोर्चा श्री. पंकज सुभाष पाटील मु.पो. घोडगाव, ता. चोपडा
3 कामगार आघाडी श्री. विलास धनसिंग राजपूत मु.पो. वाकी रोड, जामनेर
4 वैद्यकीय आघाडी डॉ. सागर सुनील गरुड मु.पो. शेंदुर्णी, ता. जामनेर
5 दिव्यांग आघाडी श्री. अरुण शामराव पाटील मु.पो. नायगाव, ता. यावल
6 अनुसूचित जाती मोर्चा श्री. नागेश्वर कौतिक साळवे मु.पो. सावखेडेसीम, ता. यावल
7 सोशल मीडिया सेल श्री. तुषार पुरुषोत्तम चौधरी मु.पो. प्रेम नगर, ता. जामनेर
या नियुक्त्यांमुळे भाजपा जळगाव जिल्हा (पूर्व) मधील संघटनात्मक कार्याला नवे बळ मिळेल. पक्ष बांधणी, जनसंपर्क आणि सामाजिक कार्यात नवे उमेद मिळून संघटन आणखी मजबूत होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी व्यक्त केला आहे.
