जामनेर तालुक्यातील खादगाव येथे आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली असून गावातील रहिवाशी गौरव अरुण भोई (वय अंदाजे 18) या तरुणाने शेतामध्ये गळफास घेऊन जीवन यात्रा संपविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे की , सकाळच्या सुमारास गावातील काही नागरिकांना शेतामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. तात्काळ त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी जामनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर कासार यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला व पंचनामा करून तो जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
या घटनेने संपूर्ण खादगाव परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, पुढील तपास जामनेर पोलिसांकडून सुरू आहे.
