आपला बातमीदार न्युज | जामनेर
जामनेर तालुक्यातील रोटवद नाचणखेडा, सार्वे, जोगलखेडा आणि लाखोली शिवारात दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक घरांनाही फटका बसला आहे.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन मंत्री गिरीष महाजन यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
गिरीष महाजन यांच्या निर्देशानंतर तहसीलदार आगळे, सर्कल, तलाठी आणि ग्रामविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष कमलाकर पाटील, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित शिवारातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तातडीने भरून काढावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे.
