आपला बातमीदार न्युज | जामनेर
शेंदुर्णी येथे संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची झालेली विटंबना याच्या निषेधार्थ आज (दि. 16 ऑगस्ट) जामनेर शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात तरुणांसह वृद्ध भीम अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाची सुरुवात जळगाव–भुसावळ रोडवरील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मोर्चा शांतेत, परंतु जोशपूर्ण निषेध घोषणांसह तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
तहसील कार्यालयात पोहोचल्यावर नायब तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनानंतर उपस्थित अनुयायांनी तीव्र भावना व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली.
या आंदोलनामुळे शहरात काही काळ वाहतूक खोळंबा झाला होता, मात्र पोलिस प्रशासनाने योग्य वेळी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
