एक धागा शौर्याचा"* या उपक्रमांतर्गत जि. प. उच्च प्रा.शाळा धानोरे ता. धरणगाव च्या विद्यार्थ्यांनी सीमेवरील सैनिकांना बनवून पाठवल्या तिरंगा राख्या
*"एक धागा शौर्याचा"* या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, धानोरे तालुका धरणगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी तिरंगा राख्या बनवून सीमेवरील सैनिकांना पाठवल्या.
उपक्रमशील शिक्षिका सौ. योगिता पंकज लोखंडे या 14 वर्षा पासून हा उपक्रम राबवत आहेत. दरवर्षी त्या विद्यार्थ्यांकडून राख्या बनवून सैनिक बांधावांना पाठवतात. सैनिक बांधवांकडून विद्यार्थ्यांना विविध भेटवस्तू व राख्या भेटल्या बद्दल पोहोच पत्र भेटते.
या उपक्रमास शाळेतील सर्वश्री सुनंदा पाटील, प्रतिभा सोनोने, ईश्वर पाटील, सुनील पाटील व
मुख्याध्यापक शरद शिंदे यांचे सहकार्य लाभले.
तसेच या उपक्रमास मा. गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले मॅडम, विस्तार अधिकारी श्री. सैंदाणे साहेब, केंद्रप्रमुख श्री. नेरकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
