आपला बातमीदार न्युज | जामनेर
बोदवड एज्यूकेशन सोसायटी संचलित रोज पेटल्स इंग्लिश मेडियम स्कूल बोदवड येथे श्री. गणेशाचे ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आगमन झाले. सकाळी अग्रसेन भवन ते शाळेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
श्री. गणरायाची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली. संस्थेचे चेअरमन श्री. मिठूलालजी अग्रवाल सर यांच्या शुभ हस्ते मंत्रोच्चाराने श्री. गणेशजी च्या मुर्तीची स्थापना करून आरती करण्यात आली. या मंगलमय प्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक श्री. आनंदजी जैस्वाल सर हे सुद्धा उपस्थित होते. या मंगलमय प्रसंगी शाळेचे प्राचार्य यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणरायाच्या आरती नंतर उपस्थितांना प्रसाद म्हणून मोदक वाटप करण्यात आले. गणरायाच्या जयघोषात हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
