ज्ञानगंगा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, जामनेर नगरपालिकेच्या सहकार्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०२५ निमित्त शाडू माती गणेश मूर्ती बनवण्याच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यशाळेत कुंभारदादा सुनील मोरे व त्यांच्या सहकारी बंधूंनी विद्यार्थ्यांना गणपती मूर्ती बनवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी मूर्तीचे योग्य प्रमाण, आकार आणि कलाकुसर कशी करावी याबद्दल सखोल माहिती दिली. यावेळी कार्यानुभव विषय शिक्षक योगेश बावस्करसर यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर गणेश मूर्ती तयार करण्यासाठी प्रोत्साहन देवून गणेश मूर्ती करून घेतल्या.आपल्या स्वतःच्या हाताने सुंदर मूर्ती तयार केल्यामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळाला,
शाडू मातीपासून गणपती तयार करण्याचा हा उपक्रम केवळ मूर्ती बनवण्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो या कलात्मक प्रक्रियेतून मुलांमध्ये सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीला वाव मिळावा हा प्रयत्न होता.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे हा असल्यामुळे, विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजले आणि त्यांच्यामध्ये पर्यावरणाविषयीची जागरूकता निर्माण झाली.
यावेळी प्राचार्य राजेंद्र सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून दिले.व व जामनेर नगर परिषदेअंतर्गत सह शालेय उपक्रम राबविण्यात आल्यामुळे सदर कार्यशाळेचे कौतुक केले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.आर.जे.सोनवणे सर, नगरपालिका तर्फे स्वच्छता निरीक्षक श्री. विजय सपकाळे सर, श्री. राहुल पाटील सर, श्री. अमित आहेर सर, श्री. श्रीकांत कोल्हे सर आणि कार्यानुभव विषय शिक्षक श्री.योगेश बावस्कर, विजय कोळी, विनय खोंडे,रुपेश क्षीरसागर,मनिषा भारंबे, वंदना उंबरकर, रोहिणी चौधरी उपस्थित होते.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कार्यानुभव विषय शिक्षक योगेश बावस्कर सर व नगरपालिका तर्फे श्री. राहुल पाटील, स्वच्छता निरीक्षक विजय सपकाळे, विशेष परिश्रम घेतले.
