आपला बातमीदार | बोदवड
रोज पेटल्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दि. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम आणि ध्वजारोहण सोहळे उत्साहात पार पडले.
दि. 13 ऑगस्ट रोजी मुख्याध्यापक श्री. अरविंद वाघ सर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर हर घर तिरंगा या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
दि. 14 ऑगस्ट रोजी शिरसाळा गावाचे सुपुत्र माजी सैनिक श्री. नितीनजी बोरसे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या दिवशी शाळेत सामूहिक पसायदान आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते..
दि. 15 ऑगस्ट रोजी संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री. मिठूलालजी अग्रवाल सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ संचालक श्री. श्रीरामभाऊ बडगुजर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी संस्थेचे व्हाइस चेअरमन श्री. अजयजी जैन, सचिव श्री. विकासभाऊ कोटेचा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सामूहिक संगीत कवायत सादर केली तसेच तंबाखूमुक्तीची शपथ घेतली.
