श्री साई सेवाभावी संस्था लातूर संचलित शक्ती सदन येथे 79 वां स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमांची सुरूवात राष्ट्रगीत म्हणून व समाजसुधारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की शक्ती सदन संस्थेतील गरजू संकटग्रस्त लाभार्थ्यांना एक वेगळी जीवनप्रणाली मिळावी यासाठी आणि मन प्रसन्न आणि समाजाप्रती बघण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी आहे.
उपस्थीत मान्यवर स्वर परी म्युझिकल ग्रूप चे अरुण शेजुळ सर मेडिकल ऑफिसर, संजय दुवे सर पेट्रोल पंप मॅनेजर आलम पटेल सर महावितरण चे कर्मचारी,भूषण दीक्षित शिवसेवा तालुका अध्यक्ष व विजय गांगे सामाजिक कार्यकर्ते आणि बचत गट कार्यकर्त्या संस्थेतील कर्मचारी मनोज पवार सर लिपीक लातूरहेड ऑफिस निवासी अधिक्षक आम्रपाली बोर्डे , महादेवी जाधव,कराड सर,विमल कोळी,आणि एकूण 50 लाभार्थी बालक उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये देश भक्ती पर सदाबहार गीत सादर करण्यात आले आणि संस्थेतील लाभार्थ्यांचे मनोगत आणि सूत्रसंचालन करुन सर्वांचे स्वागत सत्कार करून कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.
