आपला बातमीदार | जामनेर
गेल्या ११ ऑगस्ट २०२५ रोजी जामनेर तालुक्यात सुलेमान खान नामक तरुणाची अमानुषपणे हत्या होते आणि त्या घटनेला पाच दिवस उलटत नाहीत तोवर लगेच भारतीय स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी समाज कांटकाकडून विश्वरत्न,भारतीय संविधानाचे निर्माते परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याची विटंबना करण्यात येते मात्र मंत्री महोदय मुंग गिळून गप्प आहेत.... याला काय म्हणावं असा सवाल भीम आर्मी भारत एकता मिशन यांनी केला आहे.
हे जाणूनबुजून तर केल्या जात नाहीय ना या सर्व घटना घडण्यामागे कोणत्या शक्ती आहेत हे जाणून घेणं पोलीस प्रशासनच कर्तव्य आहे.
एकीकडे सर्व देशभर स्वातंत्र्य दिन साजरा केल्या जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना हा आंबेडकरी समाज कदापिही सहन करणार नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी.
सदर घटनेतील आरोपी व त्यामागील हस्तक याला पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक नाही केली तर "भिम आर्मी" भारत एकता मिशन,जळगांव जिल्हा प्रमुख मा.गणेश भाऊ सपकाळे व जामनेर तालुका प्रमुख मा.प्रबुद्ध खरे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गर्भित इशारा प्रशासनाला दिल्या गेला.
