आपला बातमीदार न्युज | बेटावद खु|| ता. जामनेर
सविस्तर वृत्त असे की,जामनेर शहरासह महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनलेली मॉब लिंचींग गुन्हा दाखल असलेली घटना मोठा चर्चेचा विषय बनले आहे.
या घटनेने जामनेर शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडालेली आहे. कॅफेत आलेल्या वीस वर्षीय तरुणाला ट्रॅप करून त्याला कॅफे, बस स्टँड, जामनेर येथील पर्यटन स्थळ असलेले सोनबर्डी ठिकाण त्यानंतर त्याच्या गावाकडे इको गाडीत घेऊन जाताना रस्त्यात असलेल्या भवानी घाटात आणि बेटावद खुर्द येथील बस स्टॅंड वर दहशत तयार करून काही तरुणांनी सुलेमान खा पठाण याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
या घटनेची माहिती इतर नेते मंडळींना मिळताच या ठिकाणी गेल्या मागील चार ते पाच दिवसात अनेक पक्षाचे नेते यांनी भेट देऊन सुलेमान खा पठाण यांच्या कुटुंबियांना धीर दिला व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
आज बेटावद खुर्द येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आय काँग्रेसचे नेते यांनी भेट देऊन प्रशासनाला खणकावत मोठ्या मागण्या केलेल्या आहेत.
