बेटावद खुर्द येथील सुलेमान खा पठाण हत्याकांड प्रकरणात आज वंचित बहुजन आघाडीने पिडीत कुटुंबियांना भेट दिली आकारा ऑगस्ट ते आता पर्यंत या प्रकरणात येणाऱ्या प्रत्येक दिवशी नवीन खुलासा होत आहे आणि येणाऱ्या राजकीय नेत्यानी नवनवीन खुलासे केले.अश्यातच आज वंचित बहुजन आघाडीतील नेत्यांनी भेटी दरम्यान परिस्थिती जाणून घेवून आज पत्रकार परिषद घेवून आज मोठे खुलासे करीत या प्रकरणात मोठा आरोप आज पोलीस प्रशासना सह भाजपा नेत्यावर ठेवण्यात आला.
🔹 गोपनीय विभागातील सचिन महाजन यांचे CDR तपासा – प्रकरणातील महत्वाचा धागा उलगडण्याची शक्यता
🔹 जामनेर शहरातील 'काका' यांच्या घरातील CCTV फुटेज तपासा – जमाव नियंत्रित करणाऱ्या सूत्रधारांचा पर्दाफाश होण्याची शक्यता.
🔹 मंत्री गिरीश महाजन यांनी पाच दिवसानंतर अंधारात भेट देवून अशी वल्गना केली कि त्यांच्या वर्तन व बोलण्याची शैली यात घटना काही मोठा एस्सू नाही.
🔹 सीबीआय चौकशी करण्यात यावी कारण एसआयटी चौकशीत जळगाव जिल्ह्यातील अधिकारी आहे त्यामुळे विश्वास नाही.
🔹 कॅफे मालक धनराज माळी याने कॅफे पोलीस स्टेशनजवळ असताना पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती का दिली नाही त्यामुळे त्याला देखील आरोपी करा.
🔹 पवन बाविस्कर याचा CDR तपासा कारण मृत सुलेमान पठाण याची वडिलांच्या सांगण्यावरून तो बेटावद खु बस स्टॅंड वर होता.
🔹 बेटावद खु येथे एवढी मोठी घटना होते पोलीस पाटील काय करीत होता. त्याला काढून टाका कारण गावाचा मुख्य पोलीस स्टेशन चा माहिती देणारा दुवा असतो.
पोलीस निरीक्षक यांना शामिबा पाटील यांनी माहिती विचारली असता पोलीस निरीक्षक यांनी तपास चालू आहे. मी माहिती देवू शकत नाही. यावर शामिबा पाटील यांनी प्रश्न केला कि ठीक आहे मग अश्लील व्हिडीओ आहे, याची माहिती आपण कशी काय साध्य केली.यावर पोलीस निरीक्षक यांच्या कडे काही उत्तर नव्हते.
शामिबा पाटील यांनी पोलीस निरीक्षक यांना आज पर्यंत या प्रकरणात काय घडामोड झाली पत्रकार परिषद घेवून आपण जनतेला कळवावे असे सडेतोड सांगितले.
असे अनेक खुलासे करीत या प्रकरणाला नवीन वळण दिले, असून आता पुढील कारवाई कोणत्या दिशेने जाईल याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
🔹 वंचित बहुजन आघाडीच्या भेटीमुळे जामनेर शहर महाराष्ट्रात नव्या चर्चेचे केंद्रबिंदू बनले.
🔹 या प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडींचा मार्ग मोकळा होत असल्याचे स्पष्ट संकेत
