जामनेर-भुसावळ रोडवरील नाना धाब्यासमोर काल झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले रवींद्र उर्फ बबलू भोईटे (रा. शास्त्रीनगर दामले प्लॉट, जामनेर) यांचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले.
त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. हसतमुख, मनमिळाऊ स्वभावामुळे बबलू भोईटे हे अनेकांच्या मनात घर करून होते.
ओम साई फॉउंडेशन चे सदस्य बबलू भाऊंची प्रतिमा ही मनमिळाऊ होती. बबलू म्हणजेच आपल्या हक्काचा माणूस. अशा व्यक्तिमत्वाचा रात्री 1.30 उपचारादरम्यान मृत्यू शी झुंज संपली. एक चांगल्या व्यक्तीचा करुण अंत झाला.
