आबा न्यूज संपादक गजानन तायडे
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर शिवारातील मेहगांव येथे आदिवासी समाजाच्या दफनभूमीची बातमी कव्हरेज करण्यासाठी गेलेले असता आपला बातमीदार संपादक गजानन तायडे,तसेच एमजेन्युज न्युज संपादक दादाराव वाघ, प्रजा न्युज संपादिका प्रिती कुमावत आणि ग्लोबल न्युज प्रतीनीधी अतुल मेढे यांना या परिसरातील त्रस्त ग्रामस्थांनी दिलेल्या माहिती नुसार कि या शिवारात कांग नदीकाठी अवैध दारू भट्टि असुन सर्रास मोठ्या प्रमाणात दारू परीसरात विकली जाते आणि यामुळे भरपूर लोकांचे संसार उध्वस्त होत आहे , नवीन पिढी दारूच्या व्यसनाने गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहेत.
म्हणून प्रथम पत्रकारांनी फत्तेपूर चे सहाय्यक पोलिस निरीक्षक फड यांना भ्रमणध्वनी द्वारे माहिती दिली. त्यांनी तात्काळ पोलीस शिपाई विनोद पाटील व भूषण पाटील यांचे पथक पाठवले,तसेच
पोलिस आणि आम्हि प्रत्यक्ष जंगलात जाऊन आमच्या समोर पोलिसांनी दारू तयार करण्यासाठीच्या जे कच्चे रसायन तीन २००लिटर प्लास्टिक च्या टाक्या म्हणजेच एकूण ६००लिटर रसायन नष्ट करण्यात आले.पंचनामा करून गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.
पत्रकारांनी केलेल्या या कौतुकास्पद कारवाईचे संपुर्ण मेहगावच्या जनतेने स्वागत केले.तसेच पत्रकारांनी पोलिस प्रशासन आणि जनतेचे आभार मानले.
