जळगाव,भुसावळ,रावेर शहरी भागातील नकली नोटाचे रॅकेट गोपनीय पथकाने केले उघडे
आबा न्यूज नेटवर्क - भुसावळ
भुसावळ शहरात तीन लाखाच्या नकली नोटा भुसावळ बाजार पेठ गोपनीय पथकांनी दि.०४/०९/२०२४ वार बुधवार रोजी संध्याकाळी आठ चाळीसच्या सुमारास विश्वासनिय माहिती मिळताच आरोंपीवर सापळा रचून केल्या जप्त।
सदर आरोपी हे होंण्डा कंपनीची ड्रीम युमा या मोटार सायकल वरती सुभाष चौक शनी पेठ १०नंबर शाळा यांचेसह एकूण ३,००,०००/रू किमतीच्या ५००/रू.दराच्या सहाशे नोटा भुसावळ शहरात घेऊन येताच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन चे पो.नि.श्री.राहुल वाघ यांना मिळाली असता त्यानूसार भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे डि.बी पथकातील पोलीस स्टाफसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले। असून
सदर आरोपींजवळ
बनावट भारतीय चलनी नोटा आढळून आल्या ने सि सि टी गुन्हा रजि नं.३५६/२०२४ भा.न्या. सं. क १७९/१८० ३/(५) प्रमाणे कायदेशीर गुन्हा नोदविण्यात आलेला आहे।
नकली नोटा विक्रीते आरोपींचे नावे १) सै.मुशाईद अली मुमताज अली राहणार उस्मानिया पार्क शिवाजी नगर जळगाव
२) अब्दुल हमीद अब्दुल कागल राहणार रसलपुर रोड, अब्दुल हमीद चौक रावेर जि.जळगाव
नदीमखान रहीमखान सुभाष चौक,शनीपेठ १० नंबर शाळा
या सदर आरोपींवर वरणगाव पोलीस स्टेशन,एम आय डि सी पोलीस स्टेशन,जि.पेठ पोलीस स्टेशन,जळगाव शहर पोलीस स्टेशन,मलकापुर पोलीस स्टेशन जि.बुलढाणा येथे गुन्हा रजि प्रमाणे कलमा आढळून आलेल्या आहेत.
कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक जळगाव श्री.महेश्वर रेड्डी,मां.अप्पर पोलीस अधिक्षक श्री.अशोक नखाते,मा.उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ श्री. कृष्णांत पिंगळे,तसेच भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक श्री.राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो उप निरीक्षक राजू सांगळे ,पो हे कॉ विजय नेरकर,पो हे कॉ निलेश चौधरी,पो हे कॉ विजय नेरकर,पो शी प्रशांत चौधरी,पो शी योगेश माळी,पो शी अमर अढाळे,पो शी दिलीप कोल्हे,पो शी राहुल वानखेड़े,पो शी भुषण चौधरी या पथकांनी आरोपीना अटक केली आहे.
पुढील तपास पो.उप.निरीक्षक श्री.राजू सांगळे करीत आहे.
