जामनेर येथे महविकास आघाडी च्या वतीने दिलीप खोडपे सरांनी केला उमेदवारी अर्ज दाखल
आबा न्यूज संपादक गजानन तायडे
जामनेर येथे विधान सभा निवडणूक २०२४ मध्ये दि.२८ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने दिलीप खोडपे सर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जामनेर शहरातील पाचोरा रोड वरील बोहरा मंगल कार्यालय येथून थेट बँड - वाज्यासह बैल गाड्यावर तहसील कार्यालय पर्यंत महाविकास आघाडीच्या सर्व नेते , पदाधिकारी तसेच हजारो संख्येने कार्यकर्ते यांच्या साहाय्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली.
दिलीप खोडपे सरांनी महाविकास आघाडी चे सर्व आजी - माजी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी दिलीप खोडपे सर पत्रकार परिषदेत विरोधकांवर बरसले.
