*तहसीलदार आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची शोध मोहीम सुरू*
*खादगाव नजिक कांग नदी पात्रात सापडला विद्यार्थिनीचा शव पण अद्याप दोघं तरुण नदीच्या पुरात झाले बेपत्ता*
मुख्य संपादक गजानन तायडे
जामनेर तालुक्यातील शहापूर येथे दि.२ रोजी संध्याकाळी अंदाजे सहा ते सात वाजेच्या सुमारास एक तरुण पुलावरून जात असताना तोल जाऊन नदी पात्रात वाहुन गेल्याची घटना घडली.
शहापूर येथील तरुण मयत मोहन पंडित सुर्यवंशी वय.४५ रा.शहापूर संध्याकाळी घरी जात असताना खडकी नदीच्या पुलावरून तोल जाऊन नदी पात्रात वाहुन गेला आहे.ही माहिती मिळताच तहसीलदार नानासाहेब आगळे तसेच (SDRF) राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य सुरू आहे पण अद्याप त्यांचा तपास लागलेला नाही.
जामनेर तालुक्यातील मुंदखेडा गावानजीकच्या सुर नदी पात्रात तरुण गेला वाहुन
जामनेर तालुक्यातील मुंदखेडा गावाजवळ सुर नदीत वाहून गेलेल्या तरुण मयत केदार गोरेलाल बारेला (पावरी) वय.२० हा तरुण आपल्या दोन मित्रांसोबत २ तारखेला संध्याकाळी घरी जातांना वाटेत असणाऱ्या सुर नदीत पोहून पार करून जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांपैकी एक तरुण वाहत्या पाण्यात बेपत्ता झाला याची खबर मिळताच तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी तसेच SDRF पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम हाती घेतली. त्यांच्या पाठीशी आपदा मित्रांची तुकडीही कार्यरत आहे, जी अशा आपत्तीजनक परिस्थितीत स्थानिक पातळीवर मदत करते. या बचावकार्यात स्थानिक ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे, ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यासारखा केदारच्या शोधासाठी कंबर कसली आहे.बचाव पथकांनी नदीच्या परिसरात शोधमोहीम जोरदारपणे सुरू ठेवली आहे. नदीचा प्रवाह तीव्र असल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत, पण SDRF आणि आपदा मित्राच्या तुकड्या अथक परिश्रम घेत आहेत. स्थानिक ग्रामस्थही या मोहिमेत सक्रिय असून, त्यांनी बोटी आणि इतर साधनांचा वापर करून नदीच्या आसपासच्या भागात शोध सुरू ठेवला आहे.
ग्रामस्थांच्या मते, प्रशासनाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे बचावकार्य अधिक प्रभावी झाले आहे. गावातील वातावरण तणावपूर्ण असले तरी, सर्वजण केदारच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत. प्रशासनाकडून या बचावकार्याला पुढील काही तासांमध्ये अधिक गती देण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
*जामनेर येथील एका विद्यार्थिनीने कांग नदीत उडी घेऊन संपविली जीवन यात्रा*
जामनेर तालुक्यातील खादगाव येथील इंदिराबाई ललवाणी शाळेतील विद्यार्थिनी मयत पुनम ज्ञानेश्वर बाविस्कर वय.१८ हिने सकाळी क्लास ला जात असताना भुसावळ रोड वरील कांग नदीत उडी घेत जीवन यात्रा संपवली.ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार तसेच तहसीलदार नानासाहेब आगळे आणि त्याच्या SDRF च्या पथकाने शोध मोहीम केली असता खादगाव जवळ नदी पात्रात विद्यार्थिनीचा शव आढळला.असून परिसरात शोककळा पसरली.
