प्रतिनिधी. मन्सूर तडवी
लोहारा तालुका रावेर सुकी नदी ही तापी नदीची उपनदी मानली जाते. ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. मध्यप्रदेशातील काकरा गावाजवळ सुकी नदीचा उगम आहे. निमाडच्या जंगलातुन वाहत महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाल,गारबर्डी ते लोहारे व तेथुन गौरखेडा,वडगाव ते तांदलवाडीपर्यंत ती वाहते व तांदलवाडीजवळ तिचा तापी नदीशी संगम होतो. सुकी नदी ही मध्यप्रदेशातील सातपुड्यातुन वाहते. झिरण्या तालुक्यातील हेलापडावा जवळील काकरा येथुन सुकी नदी उगम पावते. काकरा पासुन ते तांदलवाडी पर्यंतचाच्या अनेक ठिकाणांहुन ती वाहत जाते. बोरव्हाय,भडीक,खडक्यानदी,शेंड्याआंजन,पाल,पालची नागझीरी,सुकी धरण,पाकीट,उंबयला,नाजगरा,भुत्या,कायाडहु,पारधा,भळीक,चिचडहु,घोळीची धोंडी,मोठा असाबा,वगारचा खोदरा,लोहारा धरण(बंधारा),पाकीट,पाटी,पिपडहु,धनगर्या,चंभारडाब,पानथा,तवल्या,तळवल्या,गौरखेडा,वडगाव ते तांदलवाडी इ. ठीकाणांहुन वाहत तांदलवाडी जवळ तापी नदीशी तिचा संगम होतो.
_*नागझीरी*_
प्राचिन काळातील ऐतिहासीकतेचा उत्क्रुष्ठ असा नमुनेदार झरा,"नागझीरी" ही याच सुकी नदीवर आहे.आदिवासी तडवी भिल समाजाचे ऐतिहासीक केंद्र समजले जाणारे पाल हे गाव याच सुकि नदीवर वसले आहे. भुरेखा गुलझार यांचे जाहांगीरीचे बोरव्हाय हे गाव याच नदीकिनारी आहे._
_*नाजगरा*_
डोळ्यांचे पारणे फोडणारा निसर्गरम्य व अद्भुत असा चमत्कारीक धबधबा "नाजगरा" हा याच सुकी नदीवर आहे. प्राचिन काळातील बांधलेल्या सात विहीरी या नाजगरा याच धबधब्यात गाडल्या गेलेल्या आहेत. सातबहीणी म्हणुन म्हणुनही त्यांची ओळख आहे. नाजगरा बद्दल तडवी भिल समाजाच्या अख्यायीका पण ऐकायला मिळतात. 70च्या दशकात माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांनी या धबधब्याची पाहणी केली होती. त्यांच्यासोबत त्यावेळचे जि.प.सदस्य व लोहारा गावचे माजी सरपंच अब्बासखा सबाजखा जमादार (अबासखा माष्टर) यांनी भेट दिली होती.असे सांगीतले जाते की नाजगरा येथे औष्णीक विद्युत केंद्र उभारण्याचा त्यांचा मानस होता. स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांनी 1978 या वर्षी गारबर्डी या ठिकाणी याच सुकी नदीवर "सुकी धरण" बांधले. तसेच लोहारा येथील सुकी धरण (बंधारा) याच नदीवर आहे.
_*असाबा*_
आदिवासी तडवी भिल समाजातील सर्वात जुने व मोठे असे ऐतिहासिक कब्रस्थान (मोठा असाबा) हे याच सुकीनदीवर आहे. तडवी समाजातील सर्वात मोठे लोहारे हे गाव याच नदी किनारी वसले आहे_
जगात अनेक मानवी संस्कृत्यांचा उगम हा नद्यांपासुन झाल्याचे आपण पाहतो. अनेक ऐतिहासिक शहरे ,नगरे व गावे ही नद्याकिणारीच विकसीत झाल्याचे दिसुन येते. नदी कीनारीच मानवाचा विकास झाला. त्याच प्रमाणे सुकी नदीच्या किनारी देखील अनेक तडवी भिल या आदिवासींची संस्क्रुती व अनेक गावे विकसीत झाल्याचे आपल्याला दिसुन येते. पिढीजामली,काकरा,शेंड्याआंजन,कुंभारबर्डी,हेलापडावा,बोरव्हाय,पाल,मोंढ्याचार,चिचली,जुनीगारबर्डी,गुली,लोहारा,तळवडा,गौरखेडा,वडगाव ही पुर्वीची जुनी गावे तडवी भिल समाजानेच वसविली. यात काही गावे उजाड झाली. पण आजही आपल्या संस्क्रुतीची नाळ ही सुकी नदीशी जोडलेली आहेच. इंडियन राॆबिनहुन तंट्या मामा भिल सिरसाठे यांचे झिरण्या तालुक्यातील गढी कोठडा हे गाव देखील सुकी नदीच्या किनारीच आहे.
सातपुडाच्या सान्निध्यात गटा_तटाने वस्ती करुन राहणारा तडवी भिल समाजातील काही वस्त्या 16व्या शतकात लोहारे या ठिकाणी स्थीरावल्यानंतर येथे पाण्याची वाणवा असल्याचे आपण ऐकतो. पुर्वी येथे उन्हाळ्यात नदीचे पाणी व झरे आटल्याने पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असे असे जुने माहीतीगार सांगतात. असेही सांगीतले जाते की पाण्यासाठी या गावातील मुलांसाठी समाजातील आपल्या मुलींची लग्न करायला मागेपुढे करत असत. वधु भेटणे मुश्कील होते.!सुकी नदीवर धरण बांधल्यानंतर त्यानंतरच्या काळात सुकी नदी ही तालुक्यातली जलवाहीनी ठरलेली व तालुक्याला वरदान ठरली हे आपल्याला दिसते. हजारो हेक्टर जमीन ही सिंचनाखाली आली. रावेर तालुक्याला केळीच्या बागांसाठी जगप्रसिद्धी ही सुकी नदीमुळेच मिळाली. तालुक्याची नाईल नदी म्हणुन या नदीच्या बाबतीत म्हटले तरी वावगे ठरु नये.*_
_*✍🏻संकलन:हुसेन रुबाब जमादार*_
*मु.पो.लोहारा ता.रावेर जि.जळगाव*
