*श्री व्यंकटेश बचत गटाची वार्षिक सभा उत्साहात संपन्न*
*बचत गट म्हणून मर्यादित न राहता उत्पादक व व्यवसायिक गट म्हणून पुढे मार्गक्रमण करावे - अमोलभाऊ झाल्टे*
आबा न्यूज / जामनेर
बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या जास्तीत कर्जाचा बचत निधी वापर उद्योगासाठी करावा व बचत आता बचत गट म्हणून मर्यादित न राहता उत्पादक व व्यवसायिक गट म्हणून पुढे मार्गक्रमण केले पाहिजे. विविध उपप्रकल्पात सहभाग घेऊन गटाचा व आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करावी असे व्यंकटेश गटाचे मार्गदर्शक अमोल झाल्टे यांनी व्यक्त केले.
सभेचे अध्यक्षस्थान संदिप महाजन यांनी भुषविले.
आज दि.४/९/२०२४ बुधवार रोजी संध्या. ७:३० वा.
हाॅटेल राधाकृष्ण,नाकोडा पार्क, जामनेर येथे व्यंकटेश बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यासभे दरम्यान मागील वर्षाचा हिशोब, जमा खर्चास मंजूर देवून कर्ज वाटप मर्यादा ७५ ते ८० हजार पर्यंत ठरविण्यात आली. मासिक वर्गणी १५०० व व्याजदर १.५% ठेवण्यात आले. सभासदांनी आपली कागदपत्रे लवकरात लवकर जमा करून बचत गटाचे नवस्वरूप व पुढील वर्षाचे नियोजन याबाबत गटाचे सचिव जितेंद्र गोरे यांनी माहिती दिली.
गटाचे सभासद अमोल छगनराव झाल्टे, अरूण जगन्नाथ महाजन, अरूण शंकर मिरगे, गजानन काशिनाथ पवार, समाधान ओंकार माळी, गोरख
रामदास सोनार, अश्विन रमेश रोकडे, रविंद्र नारायण पर्वते, सागर सुरेश औटी आदी. उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र गोरे यांनी सुत्रसंचलन अश्विन रोकडे तर आभार गजानन पवार यांनी मानले.
