जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी खूप वाढली
आबा न्यूज | भुसावळ
जळगांव जिल्हयात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. दि.२९/०५/२०२४ रोजी रात्री भुसावळ शहरात जुन्या वादातून अमानुषपणे माजी नगरसेवकाच्या कारवर गोळीबार झाला असून त्यात असलेले दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की,भुसावळ शहरातील नामांकित पहिलवान स्व. मोहन बारसे यांचे पुत्र माजी नगरसेवक तसेच पहिलवान पुत्र ग्रुप चे अध्यक्ष स्व.श्री संतोष बारसे तसेच त्यांचे सहकारी मित्र सामाजिक कार्यकर्ते स्व. श्री सुनील राखुंडे हे दोघे दि.२९/०५/२०२४ च्या रात्री ९.३० ते १०.०० च्या सुमारास भुसावळ शहरातील जुना सातारा पुलाजवळ कार मध्ये बसलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या , या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. जवळच असलेल्या एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन आणि त्यांचे सहकारी करीत आहे.
या घटनेची प्राथमिक माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली. या दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना जळगांव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.
