जामनेर तालुक्यात शत - प्रतिशत भाजपा या ग्राम पंचायत निवडणुकीत सिद्ध
जामनेर तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुक २०२३ नुकताच निकाल जाहीर झाला.
यामध्ये जामनेर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या. या ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व होते. ते आजही कायम राहिले आहे.
सर्व ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच विजयी झाले आहेत.एकुलती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटाचे युवराज पाटील विजयी झाले. मात्र, त्यांनी भाजप नेते ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेऊन भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला.
त्यामुळे जामनेर तालुक्यातील सर्व सतरा ग्रामपंचायतींवर गिरीश महाजन यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे.जामनेर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींवर मंत्री गिरीश महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवल्यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. ग्रामपंचायतनिहाय विजयी उमेदवार टाकळी बुद्रुक-वंदना भाऊराव मोरे, शिंगाईत-अनिता जाधव, गारखेडा-मंगलाबाई माधव महाजन-विनविरोध, सवतखेडा-शांताबाई कडू बिल्लोर, शहापूर-जितेंद्र बाबूराव पाटील, कापूसवाडी-महेंद्रसिंग नाईक, तोरनाळे-अजंना ईश्वर पाटील, पठाडतांडा-रेणुकाबाई अरुण राठोड, खडकी-रजनी रमेश नाईक, दोंदवाडे-सुभाष पाटील, पहुरपेठ-अबू अब्दुल तडवी.
