3 व 4 नोव्हेंबर ला छापेमारी करत 36 गुन्ह्याची नोंद करून 35 आरोपींना केली अटक
आबा न्यूज | जळगाव
जळगांव जिल्ह्यातील अवैध दारू विक्री थांबविण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग जळगाव यांनी जोरदार कारवाई मोहीम राबविली. यंदा एप्रिल ते ऑक्टोंबर 2023 दरम्यान 2 कोटी 25 लाख 80 हजार 235 रुपयांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला. मागील वर्षाच्या तुलनेत या सात महिन्यात तब्बल 22 टक्के गुन्हे नोंद करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव चे अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली ही उत्पादन शुल्क विभागाने ही कार्यवाही केली आहे.
या वर्षी एप्रिल ते ऑक्टोंबर 2023 या सात महिन्यात 58 लाख 59 हजार 733 रुपयांचा वाढीव मुद्देमाल जप्त करून तब्बल 35 टक्क्यांनी वाढ मुद्देमाल जप्ती मध्ये झाली. यावर्षी जप्त वाहन कलम 93 एमपीएडीए व बंधपात्र कारवाईत 61% , 160% , 100% वाढ नोंदविण्यात आली आहे.
