आबा न्यूज | जामनेर
आज दि.28/10/2023 रोजी आयोजित केलेल्या जामनेर तालुका ग्रामसेवक संघटना डी इन ई 136 च्या कार्यकारिणी निवड सभा आयोजित करण्यात आली. यामध्ये जामनेर तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्ष पदी बिनविरोध श्री -भास्कर पुंडलिक महाजन व सचिव पदी श्री - शरद पितांबर कोळी ,उपाध्यक्ष पदी श्री - योगेश भास्कर पालवे,कोषाध्यक्ष पदी - श्री महेंद्र विठ्ठल पाटील , सहसचिव- श्री-पंकज पंडित सुरवाडे यांची निवड करण्यात आली . तसेच महिला उपाध्यक्ष पदी श्रीमती-ज्योती तायडे मॅडम व महिला संघटक पदी श्रीमती -जयश्री वराडे मॅडम ,व श्रीमती शितल पाटील मॅडम या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली .जिल्ह्यावरून आलेले प्रमुख पाहुणे श्री-रमेश पवार भाऊसाहेब व श्री तळेले भाऊसाहेब यांनी सर्व निवडणूक प्रक्रिया पार पडली .. बिनविरोध साठी सर्व ग्रामसेवक बंधू आणि भगिनी यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले तरी सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्वांचे खूप खूप अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीस शभेच्छा...
