कॉपी हा शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंक - शंकर भामेरे
आबा न्यूज | पहूर , ता . जामनेर ( ता . २ ८ )
पहुर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात कॉपीमुक्त परीक्षा आनंददायी परीक्षा अभियान राबविण्यात येत आहे . महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले .
'कॉपी 'हा शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंक असून विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत , अभ्यास करून यश मिळवावे , कॉपी मुक्त परीक्षा देऊन आनंदाने परीक्षेला सामोरे जावे , असे आवाहन शंकर भामेरे यांनी व्याख्यानात बोलताना केले .
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती व्ही . व्ही . घोंगडे , उपमुख्याध्यापिका के . ए . बनकर , एम . एच . बारी यांच्या सह सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
क्रीडा शिक्षक हरिभाऊ राऊत यांनी सुत्रसंचालन केले . विद्यार्थ्यांनी यावेळी कॉपीमुक्त परीक्षेची शपथ घेतली .
