जळगांव जिल्हा
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहरात अवैध धंद्यांचा हैदोस आबा न्यूज | जामनेर
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहरमध्ये अवैध धंद्याचा हैदोस झाल्याचा आढळून आले.जुगार अड्डा, सट्टा अवैध दारू अशा प्रकारचे अनेक अवैध धंदे जोमाने सुरू असल्याचे जनतेतून वर्तविले जात आहे.यांना कोणाचा छुपा आशीर्वाद असल्याचे जनतेतून चर्चा होत आहे.
शेंदुर्णी - सोयगाव रस्त्यावरील पत्त्याचा मोठा जुगार अड्डा चालत असून ते म्हणतात आम्ही सेक्शन भरतो डिपार्टमेंट ला आम्ही कोणालाही घाबरत नाही.अशाप्रकारची भाषा वापरतात.
पत्त्याचा क्लब हा मुख्य रस्त्याच्या कडेला असून जुगार खेळणारे खेळाडू यांच्या मोटारसायकली भर रस्त्यावर लागलेल्या असतात.सोयगाव - शेंदुर्णी ला येणाऱ्या जाणाऱ्या ना वाहतुकीचा त्रास होत आहे.यावर पोलीस प्रशासन कडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल का असा सवाल जनतेत निर्माण झाला आहे.
