महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जामनेर तालुक्याचे लाडके आमदार मा. ना. श्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दि.२१ ऑक्टोबर रोजी जामनेर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री मा. ना.श्री गुलाबराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून तर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री . आयुष प्रसाद यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
जामनेर मध्ये जिल्हा नियोजन समिती अंतर्गत एकूण 29 कामांचा भूमिपूजन सोहळा असून एकूण रक्कम ९ कोटी रु. मंजूर करण्यात आली आहे.भूमिपूजन स्थळ
खुलेनाट्यगृह, शंकर नगर सकाळी १० वाजता दामले प्लॉट, भुसावळ रोड सकाळी १०.३० वाजता समशानभूमी, जामनेर पुरा सकाळी ११ वाजता शिवाजीनगर कॉर्नर, जळगाव रोड जामनेर सकाळी ११.३० वाजता जीवन नगर, जळगाव रोड दुपारी १२ वाजता आकाश बिल्डर्स, जळगाव रोड दुपारी १२.३० वाजता मदनी नगर , दुपारी १ वाजता श्रीकृष्ण नगर, पाचोरा रोड दुपारी १.३० वाजता होणार आहे.
