आपला बातमीदार | गजानन तायडे
जामनेर (प्रतिनिधी) :
जामनेर येथील विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत यंदाही उज्ज्वल यश संपादन करत 99.49 टक्के निकालाची उल्लेखनीय नोंद केली आहे. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत गुणवत्तेची परंपरा कायम राखली असून यंदाही मुलींनी बाजी मारत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
विद्यालयातील प्रांजल अविनाश चौधरी हिने 96.00 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच श्रुती नामदेव पालवे हिने 95.60 टक्के, तेजस्विनी सुनील पाटील हिने 95.40 टक्के, निखिल ईश्वर जगताप याने 95.20 टक्के, वंशिका दिपक जाधव हिने 95.00 टक्के तर रिया अनिल पाटील हिने 95.00 टक्के गुण मिळवत विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ग्रामीण विकास तरुण मित्र मंडळ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, मुख्याध्यापक सुनील चव्हाण तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण निकालामुळे पालक व परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
