आपला बातमीदार | गजानन तायडे
जामनेर येथील तलाठी कार्यालयात सातबारा उताऱ्यावर नाव नोंदवण्यासाठी शेतकऱ्याकडे लाच मागणारा तलाठी अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकला आहे. या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्ट व्यवहार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
सविस्तर वृत्त असे की,तक्रारदार हे जामनेर येथील रहिवासी असून त्यांनी १६ डिसेंबर २०२५ रोजी जामनेर शिवारात दोन बिनशेती प्लॉट खरेदी केले होते. खरेदीनंतर त्यावर त्यावर स्वतः चे व त्यांच्या पत्नी चे नाव लावन्यासाठी अधिकार अभिलेख व ७/१२ उतारा नावावर लावण्यासाठी ते तलाठी कार्यालयात गेले असता तलाठी वसीम राजु तडवी याने ही फेरफार नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडे ५ हजाराची मागणी केली. पैशाची मागणी करणाऱ्या तलाठयास धडा शिकवन्यासाठी तक्रारदाराने ७ जानेवारी २०२६ रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
वारंवार कार्यालयात हेलपाटे मारूनही काम होत नसल्याने शेतकऱ्याने थेट ACB कडे तक्रार दाखल केली.
ACB पथकाने तातडीने सापळा रचत तलाठी कार्यालयात तलाठ्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तलाठ्याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.
ACB अधिकाऱ्यांनी सांगितले की, “महसूल विभागातील लाचखोरीबाबत आम्ही झिरो टॉलरन्स धोरण राबवत आहोत. नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार नोंदवावी, आम्ही योग्य ती कारवाई करू.”
या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत म्हटले की, “सामान्य माणसाची कामे अडवून पैसे उकळण्याचा प्रकार आता तरी थांबावा. सरकारने महसूल कार्यालयातील प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी.”
महसूल विभागातील भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत ही कारवाई एक महत्त्वाचा संदेश देणारी ठरली आहे.
