गावातील पिण्याच्या पाण्यातून मेलेल्या पक्ष्यांचे पंख आणि हाडे आढळून आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.इतकंच नव्हे तर या समस्यांबाबत सरपंच आणि ग्रामसेविकेकडे तक्रार केली असता,नागरिकांच्या प्रश्नांना केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वेळेवर पिण्याचे पाणी न मिळणे,गटारी आणि नाल्यांची साफसफाई न होणे,अशा मूलभूत नागरी समस्यांमुळे भागदरा गावातील जनता हैराण झाली आहे.आज संतप्त ग्रामस्थांनी माध्यमांसमोर येत थेट सवाल केला आहे —“आम्हाला न्याय कोण देणार?”प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊनभागदरा गावातील नागरिकांना दिलासा द्यावा,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
