रोझ पेटल्स इंग्लिश मीडियम स्कूल, बोदवड सालाबादाप्रमाणे या वर्षी सुद्धा पार पडली विद्यार्थ्यांसाठी खुली *चित्रकला स्पर्धा
ऑगस्ट ०८, २०२५
0
आपला बातमीदार न्युज | बोदवड
येथे दि. ०८/०८/२०२५ वार शुक्रवार रोजी सालाबादाप्रमाणे या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी खुली *चित्रकला स्पर्धा* पार पडली. यात सहभागी झालेले 200 विद्यार्थी चित्र साकारण्यासाठी तल्लीन झाले होते. या स्पर्धेत नर्सरी पासून ते इयत्ता 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा एकून 4 गटात घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी सुंदर आणि आकर्षक रंग भरून चित्रे आकर्षक बनवली.
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अरविंद वाघ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या प्रास्ताविकात, शाळा विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती सांगितली. शिक्षणासोबत शाळा ही कला, समाज, संस्कृती या विविध क्षेत्रातही आपला सहभाग नोंदवते. विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी चित्रकला हे अतिशय प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच चित्रकला स्पर्धा उपक्रमाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले आणि आजचं युग हे व्यापक व स्पर्धात्मक असूनही आपली शाळा ही कला जोपासण्यासाठी चित्रकला स्पर्धा गेल्या अनेक वर्ष्यापासून राबवत आहे.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद वाघ सर आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी इत्यादींचे सहकार्य लाभले.

