आपला बातमीदार न्युज | बोदवड
बोदवड़ एजूकेशन सोसायटी संचालित रोज पेटल्स इंग्लिश मेडियम स्कूल बोदवड येथे आज दि. 1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी, थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व शालेय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अरविंद वाघ सर उपस्थित होते. या दोन्ही महामानवांच्या सामाजिक कार्यांचा उजाळा विद्यालयातील शिक्षिका सौ.पूनम सोलंकी मॅडम (लोकमान्य टिळक) व सौ. किरण वाघ मॅडम (अण्णाभाऊ साठे) व त्याच प्रमाणे कु. स्नेहल वंजारी मॅडम यांनी शालेय वर्धापन दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या निमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यात प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही गटामधून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीट चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सौ. कमोदीनी बडगुजर मॅडम यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
