राष्ट्रीय शिक्षण संस्था बोदवड संचलित, सर सत्यजित राम नेमाडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोदवड येथे आज दि 1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व थोरसाहित्तिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयातील मुख्याध्यापक श्री.आर.जी. हजारी सर व प्रमुख पाहुणे म्हणून श्री.एस.पी. मंगळकर सर उपस्थित होते, या दोन्ही महामानवांच्या सामाजिक कार्यांचा उजाळा देण्यासाठी वक्ता म्हणून विद्यालयातील श्री एस एस खुरपडे ( लोकमान्य टिळक) व श्री जे टी क्षीरसागर (थोरसाहित्तिक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे) हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,त्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक या दोन्ही गटामधून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यातून प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात आले. माध्यमिक विभागामधुन (लोकमान्य टिळक पुण्यतिथी) प्रथम क्रमांक कु.अदिती सुनील मौर्य, व्दितीय क्रमांक कु.खुशी आनंदा हटकर, तृतीय क्रमांक कु. पायल तुकाराम बेलदार. तसेच (थोरसाहित्तिक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे)प्रथम क्रमांक कु. श्वेता विनोद वराडे, व्दितीय क्रमांक कु. योगिता संजय टेकाळे, तृतीय क्रमांक कु. जिजाऊ अशोक निकम. तसेच व उच्च माध्यमिक मधून प्रथम क्रमांक कु. योगिता विनोद गुरचळ, व्दितीय क्रमांक कु. स्नेहा विनोद इंगळे , तृतीय क्रमांक कु. रितिका सिद्धार्थ बाविस्कर यांनी मिळविला.विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन व आभार श्री एस डी जंगले सर यांनी केल, याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते*.
