तळेगाव ता. जामनेर (प्रतिनिधी) ता. ३०
तळेगावसह परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एका रात्रीत तीन घरे फोडली, तर दोन मोटर सायकल गाड्या चोरण्याचा प्रयत्नही केला. यामध्ये सोनं, चांदी व रोकड असा एकूण २ लाख रोख रक्कम १५ तोडे सोने ५० भार चांदी मुद्देमाल गजानन देवचंद जाधव दैनिक सकाळ पत्रकार व मीराबाई सुरेश पालवे व कौसाबाई रामलाल भडांगे यांच्या घरातून लंपास करण्यात आला. असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तळेगाव सह परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ पोलीस प्रशासनावरच संशयाची सूळ. आज पर्यंत तीन घर फोडया दोन मोटरसायकली चोरी 48 इलेक्ट्रिक मोटारी, सौर ऊर्जा वीज पंप चोरी,दोन बैल जोड्या, गोडाऊन मधला कापूस चोरी, गाई शेळ्या व अनेक किरकोळ चोर्या मात्र पोलिसांकडून एकही तपास लागत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे आवश्यकता पोलिसांकडून होत नसलेली कारवाई ही चोरांना त्यांचे मनोबल वाढवत आहे. यामुळे पोलीस प्रशासनच चोरांना मिळालेली आहेत की काय, असा प्रश्न आता ग्रामस्थ विचारू लागले आहेत.
या प्रकरणात मीराबाई सुरेश पालवे यांच्या घरातून १४ ग्रॅम सोने, सौर पंपासाठी व शेताच्या कंपाउंडसाठी आणलेली ₹१,६०,००० रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली. तर गजानन देवचंद जाधव दैनिक सकाळ पत्रकार यांच्या घरातून १२ ग्रॅम सोन्याची पोत ५०० रोख रक्कम आणि रामलाल भडांगे यांच्या घरातील कपाट तोडून ₹६०,००० रोख रक्कम, ५०० ग्रॅम चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या.
चोरट्यांनी दोन गाड्या चोरण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र त्यातील एक गाडी रामलाल भडांगे यांच्या घराजवळच सोडून देण्यात आली, तर दुसरी गाडी शहापूर शिवारातील मक्याच्या शेतात सापडली. त्या ठिकाणी दारूचे फुगेही आढळून आले असून, चोरट्यांनी तेथे मद्यपान केले असावे, असा संशय आहे.
सद्यस्थितीत गजानन देवचंद जाधव, मीराबाई पालवे, कौसाबाई रामलाल भडांगे यांची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. पोलीस तक्रार घेत नसल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अनेक वेळा पोलिसांकडे अर्ज दिल्यानंतरही तपास न केल्यामुळे चोरांचे मनोबल वाढले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये तळेगाव परिसरात इलेक्ट्रिक मोटारी व सौर पंप, बैलजोड्या, गाई शेळ्या शेतातील अवजारे गोडाऊन मधला कापूस अशा अनेक भुरट्या चोऱ्या झाल्या आहेत. मात्र त्यावर ठोस कार्यवाही न झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा यांनी लक्ष घालून तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
