आपला बातमीदार न्यूज | बोदवड
राष्ट्रीय शिक्षण संस्था बोदवड संचलित, सर सत्यजित राम नेमाडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोदवड, येथे आज दि . 28 जुलै, वार सोमवार रोजी *"जागतिक निसर्ग संवर्धन दिन"* साजरा करण्यात आला.
या निमित्ताने शाळेतील सर्व 8 ते 12 वी च्या विद्यार्थी व शिक्षकांनी वृक्षदिंडी काढून सामाजिक प्रबोधन केले. तसेच युनियन बँक ऑफ इंडिया जामनेर शाखा येथील कर्मचारी ( वृक्षप्रेमी ) जसपाल सिसोदे व जय साई राम ऑटो गॅरेज चे संचालक अमोल पवार यांच्यामार्फत करंज या वृक्षाची 50 रोपे उपलब्ध झाली .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर जी हजारी भूषविले. अध्यक्षाच्या हस्ते शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांना "एक पेड मा के नाम" व "अमृत वृक्ष" या उपक्रमांतर्गत रोपांची वाटप करण्यात आली. शासनाद्वारे राबवण्यात येणाऱ्या "एक पेड मा के नाम" या उपक्रमात आतापर्यंत जवळपास 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून, "अमृत वृक्ष" या उपक्रमात शाळेतील सर्व शिक्षकांची व शाळेची नोंदणी पूर्ण करण्यात आली. या कार्यक्रमा साठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
