आबा न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील वन अधिकारी व कर्मचारी यांना अवैध लाकूड वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच सदरील वाहन ताब्यात घेऊन वन संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की उपवनसंरक्षक जमीर शेख यांना अवैध लाकूड वाहतूक होण्याची माहिती मिळताच दि.17 रोजी दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान मोहरला ते कोरपावली या रस्त्यावर वनविभागाच्या पथकाने दबा धरून बसले होते.त्यांना ट्रॅक्टर क्र. एम एच19 बी जी 6210 विना परवाना चे अवैध लाकूड वाहतूक आढळुन आल्याने.संबधित वाहन व चालकास ताब्यात घेऊन वन संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.तसेच सदर वाहन शासकीय आगार यावल येथे जमा केले.
सदर ट्रॅक्टर मध्ये अंजन , निम इमारती लाकूड अंदाजे 18 घ.मी. तर 29508 रुपयांचा मुद्दमाल जप्त करण्यात आला.
वाहन चालक खलील रफिक तडवी रा. कोरपवली ता. यावल जि.जळगाव यावर भारतीय वनसंरक्षक अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
सदर कार्यवाही ही जमीर शेख उपवनसंरक्षक यावल विभाग , प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुनील भिलावे व वनक्षेत्रपाल स्वप्नील फटांगरे यांच्यासह पथकातील सर्व कर्मचाऱ्यांनी केली.
वन व वन्यजीव लाकूड वाहतूक संबधित कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक *1926* वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
