*19 जामनेर विधानसभा मतदारसंघात 329 मतदान केंद्रावर मतदार सखी व मतदार मित्र यांची नेमणूक*
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने 19 जामनेर विधानसभा मतदारसंघातील 329 मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदार मित्र व मतदार सखी यांची नियुक्ती करण्यात येऊन संबंधित मतदार मित्र व मतदार सखी यांचे प्रशिक्षण व आढावा बैठक आज रोजी पंचायत समिती कार्यालय जामनेर येथे घेण्यात आली.
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी केंद्रनिहाय उत्स्फूर्त स्वयंसेवक यांना मतदार मित्र तर महिला मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी संबंधित मतदान केंद्रावरील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, महिला पोलीस पाटील, महिला सरपंच यांची मतदार सखी म्हणून नेमणूक करण्यात येऊन संबंधितांना मतदार जनजागृती चे अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत व मतदारांची टक्केवारी वाढवणे संदर्भात करावयाचे कामकाजाबाबत निर्देश आजचे बैठकीत देण्यात आले.
19 जामनेर विधानसभा मतदारसंघात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहियो श्रीमती अर्चना मोरे यांचे संकल्पनेतून जामनेर मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदान मित्र व मतदान सखी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे व संबंधितांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कामकाज करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
