*जामनेरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम उत्साहात*
नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते मोहिमेचे उदघाटन
अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व आशा स्वयंसेविकांकडून लाभले विशेष सहकार्य
आबा न्यूज | जामनेर
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते हिंदवी मुळे या ३ वर्षाच्या बालिकेस पोलिओ लसीचा डोस पाजून करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जे.के.चव्हाण,व्ही.एच.माळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे,वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत,डॉ.जयश्री पाटील,डॉ.कांचन पोटे,आशा कुयटे,बशीर पिंजारी,सोनल पाटील,अण्णा जाधव,गोपाळ पाटील,रवींद्र सूर्यवंशी,सुधाकर माळी,किशोर पाटील,संगिता पाटिल,लता सुशिर उपस्थित होते.
तालुक्यात शहरी १९ व ग्रामीण २०७ बुथद्वारे ३५१९८ बालकांना पोलिओ लसीचा डोस पाजण्यात आला.
उर्वरित २०३१ बालकांना एक दिवसाच्या खंडानंतर पुढील तीन दिवस एकूण ७५७९६ घरांना भेट देऊन आय.पी.पी.आय. मोहिमेद्वारे पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत.
यासाठी एकूण २१५ टीमची स्थापना करण्यात आली असुन ६५७ अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस,गटप्रवर्तकआशा स्वयंसेविका,सेवाभावी स्वयंसेवक,आरोग्य कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आली आहे.
ज्या पालकांनी काही कारणास्तव आपल्या शून्य ते पाच वर्षांच्या वर्षाच्या बालकांना पोलिओ लसीचा डोस दिला नसेल त्यांनी पुढील तीन दिवसात पोलिओ लसीचा डोस पूर्ण करावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्याकडून करण्यात आले आहे.
