जिल्हा अधिकारी व विभागीय,उपविभागीय वन अधिकाऱ्यांना केला तक्रार अर्ज
आबा न्यूज | जामनेर
जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नागणचौकी या भागात खूप मोठ्या प्रमाणात वन विभागाची जमीन असून त्या जमिनमध्ये व हद्दीत जेसीबीच्या साह्याने अवैध प्रकारे जमीन उत्खनन चे काम दि.12 रोजी करण्यात आलेले असून त्या कामांमध्ये जेसीबीच्या साह्याने काम करण्यात आले आहे,कोणत्याही शासन परिपत्रकामध्ये किंवा वन कायद्यामध्ये नमुद नसतांना सुद्धा ते कामे जेसीबीच्या साह्याने सुरू आहे,ते कामे मजुरांमार्फत करण्यास शासनाकडून परवानगी दिली जाते मात्र या ठिकाणी मजुरांनकडुन काम न करता जेसीबीच्या साह्याने ही कामे करून घेतली जात आहे.याबाबत संबंधित वन परिक्षेत्र अधिकारी जामनेर अमोल पंडित,वनपाल प्रसाद भारुडे तसेच वनरक्षक सुनील चिंचोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी व जेसीबी क्रमांक MH.19.CZ.9316 व MH.19.CZ.5921 या दोन्ही जेसीबीनां तात्काळ ताब्यात घेऊन वन कायद्यांतर्गत कायदेशिर कारवाई करण्यात यावी.
मजुरांमार्फतच ही कामे करणे गरजेचे असताना सुद्धा मजुरांना डावलून ही कामे जेसीबीच्या साह्याने केली याकरिता संबंधित कामांचे बिले काढण्यात येऊ नये अशी तक्रार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,उपविभागीय वन अधिकारी प्रवीण ए,विभागीय वन अधिकारी धुळे यांच्या अशी तक्रार अर्जुन आसने,जयराज पवार,चेतन तायडे,नितिन सुरवाडे यांनी दाखल केलेली आहे.
