महाराष्ट्रात आगामी निवडणुकित आम आदमी पार्टी स्वबळावर लढविणार
*आम् आदमी पार्टी च्या वतीने जिल्हा आढावा बैठक संपन्न*
आबा न्यूज | जळगांव
आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री अजित भाऊ फाटके -पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बैठक संपन्न करण्यात आली. सदर बैठकीला जळगांव , धुळे, नंदुरबार विभागीय संघटक श्री . नवींदर सिंग आहुवालिया उपस्थित होते. सदरील बैठक पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आली होती .
प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री अजित भाऊ _फाटके पाटील यांनी जळगाव जिल्हा आढावा बैठक घेताना सर्व कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आम आदमी पार्टीच्या पक्षाची विचारधारा समजावून सांगितली.
तसेच आम आदमी पार्टीचे कार्य सर्वसामान्यांना उच्च दर्जाचे के जी टू पीजे मोफत दर्जेदार शिक्षण, तसेच, शेतकऱ्यांच्या मालाला उच्चभाव, 200 युनिट पर्यंत सर्वसामान्यांना मोफत वीज, उच्चतम दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत खात्री देऊन अरविंद जी केजरीवाल यांच्या कामाचा आढावा कार्यकर्त्यांसमोर मांडण्यात आला. उच्च दर्जाचे शिक्षण, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव , इत्यादी तसेच कार्यकर्त्यांशी सु-संवाद साधून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री अजित भाऊ फाटके _पाटील यांनी कार्यकर्त्यांना अनमोल मार्गदर्शन केले व आगामी निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावर लढविणार आहे याबाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच राज्य सचिव संघटक श्री नविंदरसिंग आहुवालिया यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना अनमोल मार्गदर्शन केले व पक्षाची व पार्टीची विचारधारा समजावून सांगितली.
या आढावा बैठकीला व्यासपीठावर आम आदमी पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष अभिजीत फाटके पाटील, नविंदरसिंग आहुवालिया व महानगर अध्यक्षा अमृता ताई नेतकर या होत्या.या बैठकीला निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल वाघ सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रईस भाई कुरेशी यांनी केले, प्रास्ताविक एडवोकेट विजय दाणेज यांनी केले. जळगाव जिल्हा आढावा बैठकीला संबोधित करताना अभिजीत भाऊ फाटके पाटील यांनी पार्टीची विचारधारा व तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले यावेळी रईस भाई कुरेशी, विजय दाणेज, अॅड. राहुल पाटील, प्रा .गणेश पवार, ईश्वर पाटील, प्रमोद पाटील, समाधान बाविस्कर, रईस भाई कुरेशी, नाजिम कुरेशी, इरफार पठाण, अनिल वाघ सर, अमृता नेतकर, नारायण आटकोरे, योगेश हिवरकर, चंचल सोनवणे, पराग कोचूरे, सरला सैंदाणे, धारा मॅडम व जिल्हाभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
या बैठकीला संबोधित करताना जळगाव शहरातील वर्तमानपत्रातील सर्व पत्रकार बांधव पत्रकार परिषदेला हजर होते या पत्रकार परिषदेत बेरोजगारांची समस्या उसाला हमीभाव, आरोग्याची समस्या व दर्जेदार शिक्षणाबाबत हमी याबाबत चर्चा करण्यात आली.
